पावसाने दडी मारल्याने माणमध्ये शेतकरी अडचणीत

बिदाल, दि. 28 (प्रतिनिधी) – मान्सूनच्या आगमनाने सुखावलेल्या बळीराजाला काही दिवसात दडी मारून पावसाने अडचणीत आणले. माण तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पश्‍चिम भागात धूळवाफ पेरणी तर पूर्व भागात नियमित पेरणी केली जाते. पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी प्रचंड असल्याने धुळवाफ पेरणी केली जाते. कारण पाऊस सुरु झाल्यानंतर तेथे पेरणीसाठी वेळच मिळत नाही. त्याआधारावर उत्तर माण तालुक्‍यात भागात शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. मात्र, यावर्षी पावसाने सर्वाचेच अंदाज चुकवत दमदार सुरवात केली. नंतर मात्र दडी मारली. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
माण तालुक्‍यात मोठ्या क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून कांदा, बाजरी, मुग, मका, वाटणा, उस, भुईमुग या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. अगोदरच चिंतेत असलेला शेतकरी दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. सोबत बियाणे तसेच खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे त्यांच्यासमोर यावर्षीचा हंगाम पार कसा पाडायचा याची चिंता लागून राहिली आहे. तलावातील पाणीसाठ्यांनी तळ गाठला असून ऊसासारखी बारमाही पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. उपसाबंदीमुळे शेतकरी चिंतातूर असून त्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)