नॉटिंघम: कालच्या ६ बाद ३०७ धावांवरून भारताचा पहिल्या डावाचा खेळ आज दुसऱ्या दिवशी केवळ ३२९ धावांवर आटोपला. पावसाने हजेरी लावल्याने भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु असलेल्या ३ऱ्या कसोटीचा दुसरा दिवस सुरु होण्यास व्यत्यय आला होता. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीस पावसाची संतधार सुरु असल्याने पंचानी सामना उशिरा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता परंतु नंतर पाऊसथांबल्याने मैदानाची पाहणी करून सामना सुरु करण्यात आला. भारतातर्फे दुसऱ्या दिवसाच्या सुरवातीस निराशाजनक खेळ करण्यात आला. कालच्या धावसंख्येत केवळ २२ धावांची भर घालत भारताने पहिल्या डावात नांगी टाकली. तत्पूर्वी ५ कसोटीच्या मालिकेमध्ये इंग्लंड २-० अशा आघाडीवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)