पावसाच्या व्यत्ययानंतरही न्यूझीलंडचे वर्चस्व कायम

  पहिला दिवस-रात्र कसोटी सामना : केन विल्यमसनचे शानदार शतक

ऑकलंड- पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 23.1 षटकांचा खेळ झालेल्या दुसऱ्या दिवशीही इंग्लंडवरील वर्चस्व कायम राखताना न्यूझीलंडने पहिल्या दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावांत 4 बाद 229 धावांची मजल मारली.

काल पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव केवळ 58 धावांत गुंडाळणाऱ्या न्यूझीलंडकडे आज दिवसअखेर 171 धावांची आघाडी आहे. पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा हेन्‍री निकोल्स नाबाद 49 धावांवर खेळत असून ब्रॅडली वॉटलिंग नाबाद 17 धावांवर त्याला साथ देत आहे.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याचे शतक हेच या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. केन विल्यमसनचे हे 18वे कसोटी शतक असुन तो न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या पाठोपाठ रॉस टेलर असून त्याच्या नावावर 17 शतकांची नोंद आहे.

त्याआधी आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला, तेव्हा इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनला सूर गवसला होता. पावसाळी वातावरणामुळे अँडरसनचा चेंडू व्यवस्थीत स्विंग होत असल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्याची गोलंदाजी खेळायला खूप अवघड जात होती. शतकानंतर दोन धावांची भर घातल्यावर विल्यमसनला जेम्स अँडरसननेच पायचित केले. विल्यमसनने तिसऱ्या पंचांकडे धाव घेत डीआरएसची मागणी केली. परंतु त्यातही चेंडू थेट स्टंपला धडकताना दिसल्यामुळे त्याला बाद देण्यात आले. विल्यमसन आणि हेन्‍री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली.

इंग्लंड – पहिला डाव 20.4 षटकांत सर्वबाद 58 (क्रेग ओव्हरटन 33, ट्रेन्ट बोल्ट 6-32, टिम साऊदी 4-25),
न्यूझीलंड – पहिला डाव 92.1 षटकांत 4 बाद 229 (केन विल्यमसन 102, हेन्‍री निकोल्स नाबाद 49, जेम्स अँडरसन 53-3).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)