प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – राज्यात गेले पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे. त्यातच आता उघडीप घेतल्याने परिस्थिती अवघड होत आहे.

गेल्या तीन महिन्यात पावसाची सरासरी पाहता जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्येही शेवटच्या आठवड्यात पाऊस थांबला तो अद्याप थांबलेला आहे. सध्यासुद्धा आठवडाभर पाऊस पडेल, अशी शक्‍यता नाही.

राज्यातील धरणे जरी भरली असली तरी अद्याप ही काही भागात पावसाची आवश्‍यकता आहे. सोलापूरसारख्या जिल्ह्यात तर, यंदा पाऊस झालेलाच नाही. त्यामुळे याठिकाणी शेतीची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याचबरोबर जळगाव आणि धुळ्यामध्येदेखील शेतकऱ्यांनी तिच अवस्था आहे. काही ठिकाणी तर, दुबार पेरणी करावी लागणार आहे. पण, आता पाऊस ही संपत आल्याने दुबार पेरणी करुनसुद्धा पिक हाती लागेल की, नाही याबाबत शंका आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याचा अद्याप कुठेही पंचनामा झालेला नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. जादा पावसामुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)