पावसाची संततधार सुरुच राहणार

पुणे,दि.17 (प्रतिनिधी)-गेले काही दिवसांपासून राज्यात सुरु असणारी पावसाची संततधार आणखी तीन ते चार दिवस राहण्याची शक्‍यता आहे.असे हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे.
सध्या बंगालच्या उपसागरात मान्सून टर्फ (अनुकूलस्थिती) निर्माण झाला आहे. हा टर्फ सरकत आंध्र प्रदेशाचा काही भाग तसेच मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पसरला आहे. त्यामुळे सध्या राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे.हा पाऊस जरी सगळीकडे पडत असला तरी कुठेही अतीवृष्टी होईल अशी शक्‍यता तरी सध्या दिसत नाही. राज्यात सध्या जी पावसाची संततधार सुरु आहे ती अजून चार ते पाच दिवस कायम राहिल. त्यातच बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होत असून त्याचा फायदा होऊन राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडले, विशेषत; कोकण आणि गोवा परिसरात येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. गेले अनेक दिवसांपासून कोरडा असणाऱ्या मराठवाड्यातील अनेक भागात पावसाच्या सरी पडतील.असे ही हवामान खात्याच्यावतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)