पावसाची शक्‍यता कायम, पण गारठा वाढला

File Pic

पुणे – बंगालच्या उपसागरातील वादळी स्थिती, कोकण किनारपट्टीलगत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती पूरक ठरल्याने राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. किमान तापमान सरासरीवर गेल्याने राज्याच्या बहुतांशी भागात थंडी कमी झाली आहे. गार वारे वाहत असल्याने गारठा वाढला आहे. पूर्व विदर्भात पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. यामुळे विदर्भात पावसाला पोषक हवामान होत आहे. मंगळवारपर्यंत पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील भुदरगड, सोलापूर करमाळा, सांगली जिल्ह्यांतील वाळवा तालुक्‍यांमध्ये हलक्‍या पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्‍यात पावसाच्या जोरदार सरी पडल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यातही किमान तापमानाचा पारा वाढला आहे. रविवारी शहरातील तापमान हे 12 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते. तर, दोन दिवसांपूर्वी हा पारा 9 अंशापर्यंत घसरला होता. त्यानंतर झालेल्या वातावरण बदलानंतर आता हा पारा 12 अंशापर्यंत चढला आहे.आगामी काळात शहरातील हवामान कोरडे राहणार असून किमान तापमान हे 12 अंशापर्यंत राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)