पावसाची विश्रांती आठवडाभर

file photo

 

पुणे,दि.3  -जूलै महिन्याच्या सुरवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली होती तर ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला पावसाने दडी मारली आहे.पावसाची ही दडी आणखी एक ते दिड आठवडा कायम राहणार असल्याचे हवामान खात्याच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या एक कमी दाबाचे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेशवर सक्रिय आहे.त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. सहा ऑगस्टला आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा किनारपट्टीजवळ वायव्य बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्‍यता आहे.त्यामुळे उत्तर भारतातच मान्सून सक्रिय राहणार आहे,महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण मध्यम ते हलक्‍या स्वरुपाचे राहील असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

बिहार, झारखंड आणि ईशान्य भारतातील आठ विभागांमध्ये पावसाचे प्रमाण सारासारीखाली राहिले असले तरी सध्याचा अंदाज पाहता, पुढील दोन आठवड्यांत तेथील पावसाची तूट भरून निघण्याची शक्‍यता आहे. येत्या दोन आठवड्यात कमी दाबाची क्षेत्रे उत्तर भारताला अनुकूल जागी निर्माण होणार असल्यामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांमध्ये हवामान कोरडे राहून काही भागामध्ये पावसाच्या हलक्‍या व मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील तर पुण्यात ही एक ते दोन सरी बरसण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)