पुणे – जिल्ह्यातील घाटमाथ्यांवर अद्यापही पावसाचा जोर कायम असल्याने अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे. सर्वाधिक 13 हजार 981 विसर्ग हा खडकवासला धरणातून सुरू आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पूर्ण क्षमेतेने भरली असल्याने त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यात पानशेतमधून 3 हजार 908 तर वरसगाव धरणातून 6 हजार 077 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर पवना धरणातून 2 हजार 208 तर मुळशी धरणातून 10 हजार 260 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहे.

याशिवाय जिल्ह्यातील डिंभे धरणातून 2 हजार 742 तर चासकमानमधून 4 हजार 598 भाटघर धरणातून 7 हजार 062, निरा-देवधर धरणातून 7 हजार 938 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. निरा देवघर आणि भाटघर धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे वीर धरणात जमा होत असल्याने या धरणातून सुद्धा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर मधून 23 हजार 185 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे सर्व पाणी उजनी धरणात जमा होत असल्याने उजनीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज उजनी मध्ये तब्बल 60.19 टक्के पाणीसाठा जमा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)