पावसाचा जोर ओसरला

पुणे,- राज्यात गेले चार ते पाच दिवसांपासून सुरु असणारा पावसाचा जोर आज काहीसा कमी झाला आहे.त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.

राज्यात गेले पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई तर काल विक्रमी पावसाची नोंद झाली होती. राज्यात सुध्दा अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने नद्या नाल्यांना पुर आला होता. राज्यातील नव्वद टक्के धरणे भरली असून त्यातून विसर्ग ही सुरु झाला आहे. काल मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे आता मध्य गुजरातच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या राज्यात अनेक भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळतील तर कोकणात मात्र काही भागात मुसळधार पाऊस पडेल

पुणे शहरात ही आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती.संध्याकाळी काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्या पण त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती.सकाळी तर आज चक्क उन पडले होते.

धरणांमधील विसर्ग कमी
जिल्ह्यातील धरण परिसरातही आज पावसाचा जोर कमी झाल्याने गेले काही दिवसांपासून धरणांमधून सुरु असणारा विसर्ग ही कमी करण्यात आला आहे.जिल्ह्यातील मुळशी धरणातून सर्वाधिक म्हणजे दहा हजार क्‍युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.त्याचबरोबर खडकवासला धरणातून सध्या तीन हजार 424 क्‍यसेक ने विसर्ग सुरु आहे.उर्वरित पवना,डिंभे,चासकमान या धरणातील विसर्ग ही अत्यंत कमी करण्यात आला आहे.

उजनी 99 टक्के भरले विसर्ग सुरु
गेले काही दिवसांपासून जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सोलापूर शहरासाठी जिवनदायनी असलेले उजनी धरण हे 99 टक्के भरले आहे.त्यामुळे या धरणातून ही आता विसर्ग सुरु करण्यात आला आहे.सध्या या धरणातून तब्बल चाळीस हजार क्‍युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.धरणात जमा होणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढविण्यात येईल असे ही सिंचन विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.सध्या उजनी मध्ये तब्बल 53.40 टीएमसी इतका पाणी साठा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)