पावसाअभावी सिमेंटचे बंधारे पडले कोरडे

लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाअभावी रब्बी हंगाम धोक्‍यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसात दुष्काळाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. सिमेंट बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले आहेत तर कुपनलिकांचे पाणीही कमी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. लोणी धामणी परिसरात दिवाळीनंतर रोजगार हमीची कामे सुरू करावी लागतील अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने तालुक्‍यात दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यावर्षी सरसरी पेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्‍यात पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आंबेगाव तालुक्‍याला सध्या पाण्याचा प्रश्‍न भेडसावत असून परतीच्या पावसाने ही घुलकावणी दिली आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावला आहे. पेरणी केलेली रब्बी पिके वाया जाणार असून काही शेतकऱ्यांनी तर रब्बीची पेरणी केलेले नाही. त्यामुळे रब्बीचा हंगाम वाया जाऊन शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
तसेच जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने या वर्षी उन्हाळ्याच्या आधीच पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या तालुक्‍यात दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे शेतातील पिकेही धोक्‍यात आली आहेत. पाऊस कमी असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे विहिरींतील पाणीसाठा तळाला गेला आहे. पाण्याच्या प्रश्‍नामुळे आंबेगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या ऊसालाही या दुष्काळाचा सामना करावा लागणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे. शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)