पावभाजी उशिरा दिल्याने सातारा रस्त्यावर ‘राडा’

हातगाडी चालकास पालघन, उलथणे व लोखंडी हत्याराने मारहाण

पुणे – पावभाजीची ऑर्डर उशिरा दिल्याने सातारा रस्त्यावर चार जणांच्या टोळक्‍याने धुमाकूळ घातला. त्यांनी हातगाडी चालकास पालघन, उलथणे आणि लोखंडी हत्याराने मारहाण केली. ही घटना आदिनाथ कॉम्पलेक्‍सच्या गेटच्या बाहेर रविवारी रात्री घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी मिलिंद भालेराव यांचे सातारा रस्त्यावर आदिनाथ कॉम्पलेक्‍सजवळ पूजा पावभाजी आणि ए-वन सॅन्डवीज नावाच्या खाद्यपदार्थाच्या दोन हातगाड्या आहेत. रविवारी रात्री त्यांना चौघांनी पावभाजीची ऑर्डर दिली होती. त्यांचे कामगार पावभाजीची ऑर्डर बनवत होते. पण, त्याला उशीर झाल्याने चौघांनीही फिर्यादीस शिवीगाळ लोखंडी हत्याराने मारहाण करुन चौघेही निघून गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)