पावणे पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

पिंपरी – चिंचवड येथील एका व्यावसायिकाचे मोबाईल सिम कार्ड वापरून त्याच्या कंपनीच्या बॅंक खात्यामधील तब्बल 4 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना रविवारी (दि. 25) ते मंगळवारी (दि.27) दरम्यान झाली आहे.

सुधीर पिंपळे (वय 51, रा. तानाजीनगर, चिंचवड) असे फसवणुक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी एका अज्ञात व्यक्तिविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर पिंपळे हे वापरत असलेला मोबाईल क्रमांक एका अज्ञात व्यक्तीने त्याचा असल्याचे सांगून तो मोबाईल क्रमांक बंद केला. तसेच तो मोबाईल क्रमांक पुन्हा बनावट कागदपत्र सादर करुन सुरु केला. तसेच तो मोबाईल क्रमांक पिंपळे यांनी त्यांच्या कंपनीच्या बॅंक खात्याला लिंक केलेल्या बॅंक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने 4 लाख 88 हजार रुपये स्वत: च्या बॅंक खात्यात घेतले.चिंचवड पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)