पावणे दोन लाख बालकांना पोलिओ लसीकरण

पिंपरी – राज्य शासनाच्या आदेशानूसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रविवारी (दि.28) शहरात 855 लसीकरण केंद्रांमार्फत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे पावणे दोन लाख बालकांना पोलिओंचे लसीकरण वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले.

महापालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात सकाळी साडेनऊ वाजता महापौर नितीन काळजे यांचे हस्ते बालकांला पोलिओ डोस पाजून लसीकरण मोहीमेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षां डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत शिंदे, सहाय्यक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर, रोटरी क्‍लब अध्यक्ष, पदाधिकारी, भोसरी रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या हद्दीत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या आदेशानूसार 28 फेब्रुवारी सर्वत्र राबविण्यात आली. या मोहीमेत पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ लसीकरण करण्यात येणार आले. याकरिता शहरात 855 लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली. महापालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा 766 ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली. तसेच फिरत्या लोकांची टीम, शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी, झोपड्या टाकून राहिलेल्या ठिकाणच्या मुलांसाठी 58 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय करण्यात आली. या मोहिमेच्या प्रचार स्लिप वाटप, बॅनर्स, स्टीकर्स, वॉल पेंटींग या माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात आला. या मोहिमेसाठी 53 वैद्यकीय अधिकारी, 193 पर्यवेक्षक व 2 हजार 734 लसीकरण कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे 855 लसीकरण केंद्रांमार्फत 8 विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, 53 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली 193 पर्यवेक्षक 2 हजार 734 लसीकरण कर्मचारी काम केले आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्‍लबचे स्वयंसेवक, मनपा क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी, एमपीडब्ल्यु, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रिडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व इतर स्वयंसेवकांचा सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)