पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

पिंपरी – घराची खिडकी तोडून घरातील एक लाख 76 हजार 831 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. हा प्रकार नुकताच पिंपळे गुरव येथील शिवरामनगरमध्ये उघडकीस आला.

अंकुश वसंत इंगळे (वय 53, रा. पुजा बंगला, शिवराम नगर, पिंपळेगुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे सोमवारी (दि. 11) सकाळी दहाच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले एक हजार 252 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि 4 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 76 हजार 831 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. मंगळवारी दुपारी पाचच्या सुमारास इंगळे घरी परत आले असता, हा प्रकार उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)