पावणे दोन कोटी रुपयांचे अंडे !!!

जगात एका बाजूला अफाट श्रीमंती, सधनता, समृद्धी आहे, तर दुसऱ्या बाजूला गरिबी, दारिद्य्र, कुपोषण, उपासमारी आहे. या दुसऱ्या वर्गाचं निम्मं आयुष्य श्रीमंतांच्या झगमगाटाकडं पाहून खंत बाळगण्यातच जात असतं. श्रीमंतांची अय्याशी पाहून नशिबाला दोष देत ते आपलं जीणं जगत असतात. त्यांना रोजच्या भाकरीची भ्रांत असते; पण त्याच वेळी श्रीमंत वर्गातील कोणी तरी लाखो रुपयांचा पेन खरेदी करताना दिसतो. अशा उच्चभ्रू वर्गाच्या खिशात हात घालून पैसे काढण्यासाठी अनेक व्यावसायिक, विक्रेते, उत्पादक नवनव्या शक्‍कल लढवत असतात.

कधी कुणी सोन्याचा शर्ट तयार करतो, तर कधी कोणी हिऱ्यांनी जडलेला मोबाईल! आता हेच पहा ना! रोजच्या खाण्यातला पदार्थ असणारे अंडे कधी हिऱ्यांनी जडलेले असू शकते याची कल्पना तरी तुम्ही केली होती का? पण असं घडलं आहे. हे अंडे एखाद्या आलिशान घरापेक्षाही महागडे आहे. हे अंडे साधे अंडे नसून 18 कॅरेटच्या 910 व्हाईट गोल्ड हिरेजडीत आहे. लंडनमधील एका ज्वेलरी ब्रॅंडने या अंड्याची निर्मिती केली आहे. “डायमंड मेमरी एग’ असे या अंड्याचे नाव आहे. त्याची किंमत 1 कोटी 75 लाख रुपये आहे. इतक्‍या किमतीत आलिशान बंगलाही उभा राहू शकतो. या अंड्याचे आणखी एक वैशिष्ट्‌य म्हणजे दोन छायाचित्रे लावण्याची यामध्ये सुविधा आहे. त्यामुळे प्रेमी युगुल किंवा प्रेमी दाम्पत्याची सोय करण्यात आलेली आहे. अशी छायाचित्रे लावून हे अंडे गळ्यातही एखाद्या लॉकेटसारखे अडकवता येऊ शकते. हे अंडे ब्रिटनमध्ये अनेकांसाठी कुतुहलाचा विषय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)