पावणे तीन लाखांची घरफोडी

पिंपरी – बंद सदनिकेचे कुलुप तोडुन चोरट्याने भरदिवसा पावणे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा ते अडीचच्या दरम्यान चिंचवड येथे घडली.

वैशाली भुतकर (वय 45, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी भुतकर यामंची सदनिका बमद असताना चोरट्याने सदनिकेच्या दरवाजाचे कुलुप तोडुन घरातील कपाटामधील सोन्या-चांदीचे दागिने व रोख दोन हजार रुपये असा एकूण दोन लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)