पावणेदोन लाखांची दारू जप्त

पिंपरी – बेकायदेशीररित्या दारूची वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक करत त्यांच्याकडून पावणे दोन लाखांची दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने मंगळवारी ( दि. 13 ) ही कारवाई केली.

या प्रकरणी सिद्धांत प्रभाकर सानप (वय-26), गजानन रामराव बांगर (वय-32, दिघे रा. खराबवाडी, चाकण), स्वप्नील विलास काकडे (वय-26, रा. पालघरेवस्ती, चिखली), संदीप भानुदास जांभुळकर (वय-28, रा. माणिक चौक, चाकण) यांना अटक करण्यात आली आहे.

-Ads-

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकातील पोलीस कर्मचारी आशिष बनकर यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, परिसरातील ढाब्यांवर अवैध दारू विक्री केली जात असून या ढाब्यांवर दारू पुरवठा करणारी वाहने चाकण येथून जाणार आहेत.

या खबरीवरून पोलिसांनी चाकण परिसरात सापळा रचून दारू घेऊन जाणारा टेम्पो आणि एक कार असा एकूण 12 लाख 20 हजार 195 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, कर्मचारी शैलेश सुर्वे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, अशोक दुधवने, शरीफ मुलानी, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)