पुणे- कोथरूड भागात पाळणाघरात ठेवलेल्या 3 वर्षे 7 महिन्याच्या चिमुकलीशी दोघांनी अश्‍लील चाळे केल्याचे उघड झाले आहे. त्यापैकी एकाला पोलिसांनी अटक केली असून, दुसरा मुलगा अल्पवयीन आहे. अटक केलेल्या मुलाला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी दिला आहे.
अथर्व रतन भास्कर (वय 18, रा. शिवणे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना 30 ऑगस्ट रोजी कोथरूड, गुजरात कॉलनी परिसरातील एका पाळणाघरात घडली. फिर्यादी यांनी मुलीला घरगुती पाळणाघरात ठेवले होते. या पाळणाघर चालकाचा मुलगा आणि त्याच्या मित्राने पीडित मुली बरोबर अश्‍लील चाळे केले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी भास्कर याला अटक करून कोथरूड पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, पाळणाघरातील इतर बालकांशी अशा प्रकारचे कृत्य केले आहे का?, या गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहे का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)