पाळणाघरात मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे- कोथरूड, गुजरात कॉलनी भागातील एका पाळणाघरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात तरूणाचा जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी हा आदेश दिला आहे. अथर्व रतन भास्कर (वय 18, रा. शिवणे), असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत 3 वर्षे 7 महिन्याच्या पीडित मुलीच्या आईने कोथरूड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 7 आणि 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे. एका अल्पवयीन मुलालाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना दि. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.10 च्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी अथर्व याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्‍त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्‍तीवाद ऍड. पाठक यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने अथर्व याचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)