पाल यात्रेत स्टँटर्ड ऑपरेटींग सिस्टीम राबविणार : प्रांताधिकारी खराडे

पाल : यात्रा नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी हिम्मत खराडे. समवेत नवनाथ ढवळे, देवस्थानचे प्रमुख देवराज पाटील व अन्य.

पाल यात्रा नियोजन बैठक
उंब्रज, दि. 15 (वार्ताहर) – पाल यात्रा शांततेत पार पाडण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येक विभागाने स्टँर्डड ऑपरेटींग सिस्टीमनुसार आपली जबाबदारी चोख पार पाडावी, पाल यात्रेस अद्याप दोन महिन्यांचा कालावधी असून तयारीला वेळ मिळणार आहे. वेळेचे कारण कुणाचेही चालणार नाही अशा सक्त सूचना प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या. तर यात्रेच्या अनुषंगाने अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खास बाब म्हणून डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशा मागणी देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा माजी सभापती देवराज पाटील यांनी केली.
महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असणार्‍या पाल ता. कराड येथील मल्हारी-म्हळसा विवाह सोहळा (यात्रा) 18 जानेवारी 2019 रोजी होत असून, त्याअनुषंगाने श्री खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, नायब तहसिलदार कुराडे, सपोनि. प्रताप भोसले, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सरपंच जगन्नाथ पालकर, उपसरपंच अंजली लवंदे, यात्रा कमिटीच्या अध्यक्षा प्रतिभा पवार, देवस्थानचे संचालक संजयकाका काळभोर, सचिन लवंदे, बाबासाहेब शेळके इत्यादी मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देवराज पाटील म्हणाले, पाल यात्रेच्या अनुषंगाने मिरवणूक मार्गावर कायमस्वरूपी पूल, देवस्थानसाठी वीज वितरण कंपनीने स्वतंत्र डीपी उभारावा, यात्रा मार्गावर सर्व विद्युत तारा अंडरग्राऊंड करणे, आदर्शनगर ते पाल रस्त्यावर स्ट्रीट लाईट, पालसाठी कायमस्वरूपी एसटी बसस्थानक, इंदोली वडगांव मार्गे पाल हा रस्ताचे काम यात्रे अगोदर पूर्ण करावे, आपत्कालीन रस्ता, काशिळ पाल रस्ता, हरपळवाडी पाल रस्ता अशा महत्त्वाच्या कामासाठी संबंधित विभागाने जिल्हा प्रशासनाकडे तातडीने निधीची मागणी करावी. तर जिल्हा प्रशासनाने कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी खास बाब म्हणून पाल यात्रेच्या अनुषंगाने डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
यावेळी विज वितरण, एसटी महामंडळ, प्रादेशिक परीवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, पाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा विभाग, पशुसंवर्धन,ग्रामपंचायत विभाग, पोलिस प्रशासन आदी विभागाने आपल्या कामकाजाचा गोषवारा सादर केला.
प्रांताधिकारी खराडे यांनी सर्व विभागाचे वरीष्ठ अधिकार्‍यांनी यापुढील आढावा बैठकीस हजर रहावे. तसेच प्रत्येक विभागाने आपल्या कामाचा अहवाल पाच डिसेंबर रोजी प्रांत कार्यालय व देवस्थान कार्यालयात सादर करण्याच्या सक्त सुचना त्यांनी यावेळी दिल्या. प्रास्ताविक उध्दवराव फाळके यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य संदिप चव्हाण यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)