पालेभाज्यांच्या भावातील तेजी कायम

पुणे – वाढलेली आवक, घटलेल्या मागणीमुळे मेथी, चुका आणि कोथिंबीरीच्या भावात किंचीतशी घट झाली आहे. तरीही या तीन्ही भाज्यातील तेजी कायम आहे. दुसरीकडे करडई, अंबाडी, चवळई आदी भाज्यांच्या भावात 5 ते 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची सुमारे 90 हजार जुडी, तर मेथीची 30 हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिर, मेथीच्या जुडीला दर्जानुसार अनुक्रमे 7 ते 18 आणि 8 ते 16 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात दोन्ही भाज्यांच्या जुडीसाठी 10 ते 20 रुपये मोजावे लागत असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 700-1800, मेथी : 800-1600, शेपू : 1000-1200, कांदापात : 500-1000, चाकवत : 500-1000, करडई : 500-800, पुदिना : 200-300, अंबाडी : 800-1000, मुळे : 1000-1500, राजगिरा : 500-800, चुका : 500-800, चवळई : 500-800, पालक : 500-700.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)