पालेभाजी, फुलशेतीवर किडी रोगाचा प्रादुर्भाव

चिंबळी- वातावरणत होणाऱ्या सततच्या बदलामुळे खेड तालुक्‍याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या पालेभाजी, फुलशेतीवर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. चिंबळी परिसरात शेतकरी वर्गाने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाबरोबर घेतलेल्या भेंडी, गवार, वांगी, पावटा आदींसह झेडू, बिजली फुलांची शेती केली आहे; पंरतु वातावरणातील सततच्या बदलामुळे फुलशेतीसह पालेभाज्यांवर किडीरोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घटन झाली आहे. त्यामुळे केलेला खर्चही वसूल होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. चिंबळी येथील काही शेतकऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी भेंडीची टोकण पद्धतीने लागवड करून विविध प्रकारच्या औषधाची फवारणी व खुरपणी करून निगा राखली. मात्र, वातावरणतील सततच्या बदलामुळे भेंडी पिकावर ताबेंरा व काळ्या किडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाल्याने आणि त्यातच बाजार भाव नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)