पालिकेविरोधातील तक्रारींची जिल्हाअधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

महाबळेश्‍वर – महाबळेश्‍वर पालिकेच्या विरोधात केलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी घेतली असून नगरसेवक अपात्रता प्रकरणासह सर्वच प्रलंबित प्रकरणाची तातडीने चौकशी पूर्ण करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी यांनी दिली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी दिली.
पालिकेतील सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनी पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केला आहे.

या प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी यांचे कोर्टात एकयाचिका दाखल करण्यात आली आहे. अशा याचिकांचा निकाल 90 दिवसात देण्याबाबत राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परंतु, गेली पावणे दोन वर्षे हे प्रकरण सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. प्रारंभी या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. पंरतु अलिकडे एक वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी बंद करण्यात आली आहे. या प्रकरणी वर्तमानपत्रात वृत्त प्रसिध्द झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वृत्तात नागरिकांचा हवाला देवून सातारा जिल्हाधिकारी हे प्रकरण प्रलंबित ठेवून सत्ताधारी भाजपा व राष्ट्रादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना अभय देत आहेत असा आरोप केला होता. तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी काही बेकायदशीर ठराव 308 कलमा नुसार रद्द करण्याची मागणी केली होती. याबाबतही जिल्हाधिकारी यांनी कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पालिकेत मनमानी व भ्रष्टाचाराचा कारभार सुरू आहे, असा आरोप करून येथील एका पक्षाच्या पदाधिकारी यांनी पालिकेतील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करून तक्रार केली होती परंतु या तक्रारीची दखलदेखील जिल्हाधिकारी यांनी घेतली नसल्याने शहरात एक प्रकारे जिल्हाधिकरी पालिकेच्या भ्रष्ट कारभारास अभय देतात असे वृत्त प्रसिध्द झाले होते.

पालिकेच्या विरोधातील तक्रारींचा निर्णय जिल्हाधिकारीयांनी तातडीने द्यावा यासाठी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी यांची सातारा कार्यालयात त्यांची भेट घेतली व प्रलंबित प्रकरणाबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कोणकोणती प्रकरणे प्रलंबित आहे, याची माहिती घेतली व त्यांनी तातडीने सर्व प्रकरणाच्या फाईल मागवून घेतल्या व या सर्व प्रकरणे मी लवकरात लवकर निकाली काढते असे आश्‍वासन दिले. यावेळी नगरसेवक संजय पिसाळ यांनी स्वच्छता अभियानात मागील वर्षी पालिकेने मोठा भ्रष्टाचार केला आहे ही बाब निदर्शनास आणून दिली.

भिंत्तींचे रंगकाम फ्लेक्‍स प्रिटींग यांना भरमसाठ दर दिला आहे. बाजार भावापेक्षा अधिक दर देवून भ्रष्टाचार करण्यात आला आहे. तसेच विविध वस्तुची खरेदी ठराव न करताच करण्यात आली आहे. तसेच दरही दुप्पट ते चौपट लावण्यात आले आहे. मागील वर्षी पालिकेत साधारण विविध विषयात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणाची आपण निपक्ष चौकशी करावी अशी मागणीही संजय पिसाळ यांनी या वेळी जिल्हाधिकारी यांचे कडे केली या वेळी डी. एम. बावळेकर यांचेसोबत माजी नगरसेवक संतोष शिंदे, सलिम बागवान, सचिन वागदरे, विलास काळे हे ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)