पालिकेला जलसंपदा विभागाचा झटका

जादा पाणी घेतल्याने पाणी केले बंद

पुणे : कालवा समितीच्या बैठकीत पालिकेस 1150 एमएलडी पाणी मंजूर झाले आहे. असे असतानाही पालिका खडकवासला धरणातून जादा पाणी घेत असल्याचे निदर्शनास येताच पाटबंधारे विभागाकडून बुधवारी दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले. अचानक बंद झालेल्या पाण्यामुळे पालिकेस केवळ पर्वती जलकेंद्रांतूनच पाणी पुरवठा करण्यात आला. तर लष्कर जलकेंद्राला पाणीच देता आले नाही परिणामी शहराच्या पूर्व भागाला ऐन नवरात्र सुरु असताना अचानक पाणी कपातीचा सामना करावा लागला असून खराडी, वडगावशेरी, चंदन नगर तसेच हडपसरच्या काही भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
13 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
8 :cry: Sad
15 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)