पालिकेने विस्थापित व्यावसायिकांसाठी गाळे बांधावेत

पाथर्डी: शहरातील अतिक्रमण हटवल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेने वसंतराव नाईक पुतळ्यामागील नगरपालिकेच्या जागेवर गाळे बांधून, या विस्थापित लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी जिल्हाधिकारी व पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर छोट्या-छोट्या व्यवसायिकांनी आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली आहेत. मात्र त्यामुळे शहरात हातगाडी लावून, छोट्या टपऱ्या टाकून किंवा रस्त्याच्या बाजूला बसून व्यवसाय करणाऱ्या, छोट्या व्यवसायिकांचा रोजीरोटीचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या विस्थापितांचे पुनर्वसन करणे प्रशासनाची जबाबदारी असून, शहरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या मागे नगरपालिकेच्या मालकीची जुनी इमारत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या इमारतीमध्ये पालिकेने गाळे काढून, या विस्थापित लोकांना भाडेतत्त्वावर द्यावेत व त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न मार्गी लावावा, यामुळे शहरातील विस्थापित व बेरोजगार झालेल्या या छोट्या व्यवसायिकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सुटेल व पालिकेला उत्पन्नही मिळेल, त्यामुळे याबाबत पालिकेने विशेष बैठक बोलवून ठराव करावा व विस्थापितांना आधार द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)