पालिकेत तंबाखू बहाद्दरांकडून दंड वसूल

कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त आलेल्या नागरिकांवर कारवाई

पुणे – महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये खिशात तंबाखू आणि गुटख्याच्या पुड्या घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त आलेल्या नागरिकांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली.

-Ads-

पालिकेकडून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. शहरात कारवाई सुरू असतानाच पालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्वच्छतागृहे तसेच जिन्यांच्या भिंतीवर मोठ्या प्रमाणात थुंकणे असे प्रकार घडत आहेत. महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात असली तरी दिवसभरात प्रत्येक नागरिकांवर कारवाई करणे शक्‍य नाही. ही बाब लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळच महापालिकेत आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. त्यात सुमारे 11 नागरिक तसेच कर्मचाऱ्यांकडे तंबाखू तसेच गुटख्याच्या पुड्या आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे 1,650 रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती स्वच्छ सर्वेक्षण मोहीमेचे समन्वयक माधव जगताप यांनी सांगितले.

कामाच्या ठिकाणी होणार तपासणी
महापालिकेने नव्याने बांधलेल्या विस्तारीत इमारतीमध्ये मागील आठवड्यात झालेल्या मुख्यसभेच्या वेळी काही नागरिकांकडून या इमारतीच्या भींती तसेच स्वच्छता गृहांत मोठी घाण करण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने इमारतीमध्ये येतानाच नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. या शिवाय, पुढील टप्प्यात पालिका कर्मचाऱ्यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणी तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)