पालिकेतील सर्वसाधारण सभेत पालिका कर्मचारी धारेवर

वाई : प्रतिनिधी
ुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांनी प्रशासनाची बाजू मांडल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील 63 विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी पालिकेतील सर्वसाधारण सभेत पालिकेतील कर्मचाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रशासनावर तशेरे ओढत विविध विषयांचा उहापोह केला.
वाई शहरात दररोज गोळा करण्यात येणाऱ्या कचर्याच्या वर्गीकरण कारणाबाबत ऐनवेळीच्या विषयाने उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी कडक शब्दात प्रशासनावर ताशेरे ओढत ठेकेदार करारानुसार काम करीत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पालिकेचा वाई ग्रामीण रुग्णालयात काम करीत असलेला कर्मचारी संदेश चव्हाण व सौ.कविता मुळीक यांच्या सेवानिवृत्ती नंतरचे सर्व लाभ न देवून वेठीस धरल्याबद्दल पालिका अस्थापनप्रमुख अनंत भारस्कर यांची खाते निहाय चौकशी करावी व तोपर्यंत त्याचे वेतन थांबविण्यात यावे, अशी आग्रही भूमिका सर्वच नगरसेवकांनी घेतली. प्रशासनाची पालिका पदाधिकाऱ्यांशी योग्य समन्वय नसल्याने पालिकेचा नाट्यगृहासाठी आलेला निधी शासनाच्या तिजोरीत परत पाठविण्याची नामुष्की वाई पालिकेवर ओढावली आहे.दरम्यान 15 ऑगस्ट रोजी वाई पालिका प्रशासनाने भाजीमंडईतील हुतात्मा स्तंभ व हुतात्मा स्मारकाची जागा पालिकेच्या ताब्यात असूनही हुतात्मा स्मारकाचा लोकार्पण सोहळा आयोजित केल्याबद्दल सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील मोडकळीस आलेल्या इमारती संदर्भात संबंधिताना नोटीस काढण्यात येवून त्या इमारती अपघात घडण्या अगोदर रिकाम्या करणयात याव्यात या विषयी सर्वांचे एकमत झाले. पालिकेच्या भाडे करारावर दिलेल्या गाळ्यांच्या संदर्भात प्रशासनाकडून होत असलेली चालढकल याबद्दल सत्ताधारी व विरोधक यांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले व त्यावर योग्य समन्वय साधून मार्ग काढण्याचा ठराव करण्यात आला. तसेच स्वच्छ भारत अभियान काळात वाई शहरातील खाजगी वाहनचालकांकडून जे स्वच्छते संदर्भात कामे करून घेतली आहेत. त्यांची बिले वेळेत न दिल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. त्याच प्रमाणे वाईकर नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असणारा स्विमिंग पुलाच्या लाईट बिलासंदर्भात हा विषय पत्रिकेत का घेण्यात आला. यावर प्रशासन व पालिका पदाधिकारी यांच्यात तू-तू-मै-मै झाली. आज झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासन विरुध्द पालिका पदाधिकारी असे चित्र निर्माण झाले होते. या विषयांसह शहरातील विविध 63 विषयांवर चार तास प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. सर्वसाधारण सभेत तीर्थक्षेत्र आघाडीचे आरोग्य सभापती- चरण गायकवाड, राजेश गुरव, भारत खामकर, दीपक ओसवाल, प्रदीप चोरगे, ऍड. श्रीकांत चव्हाण, यांच्यासह वाई विकास महाघाडीचे नगरसेवक- महेंद्र धनवे, सतीश वैराट, यांनी चर्चेत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)