पुणे: पालिकेतील “वक्‍तव्य’ वादाचा दुसरा अंक

काय म्हटले आहे पत्रात?
“भिमाले यांनी वापरलेली भाषा आणि केलेला उल्लेख हा जाणूनबुजून, हेतुपुरस्सर बदनामी करण्याच्या उद्देशाने केली असून, हे वक्तव्य माझी अब्रु नुकसान करत आहेत’ असे शिंदे यांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे. या कारणासाठी भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.

अरविंद शिंदे यांची श्रीनाथ भिमाले यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार
…तर शाब्दिक चकमक हाणामारीवर जाईल : मनसे

पुणे – महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्या विरोधात महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी शिवाजीनगर पोलीसांत तक्रार अर्ज दिला आहे. दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यसभेत दोघांत झालेल्या वादावादीमध्ये शिंदे यांच्याविषयी असभ्य आणि बदनामी करणारे वक्तव्य केल्याबद्दल ही तक्रार करण्यात आली आहे.

महापालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभागात काम करणाऱ्या किशोर पडळ या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणाचा विषय शिंदे यांनी महापालिका मुख्यसभेत उपस्थित केला होता. त्या संबंधीची तपशीलवार माहिती शिंदे यांनी सभागृहात संबंधित खात्याच्या प्रमुखांना मागितली. त्याला अधिकारी उत्तर देण्याऐवजी भिमाले यांनी उलट उत्तरे देण्याला सुरूवात केली. त्याचे पर्यावसान हमरीतुमरीमध्ये झाले आणि भिमाले यांनी शिंदे यांना एकेरीवर संबोधित करून, आक्षेपार्ह भाषा वापरली.

मनसेचेही महापौरांना पत्र
शिंदे यांच्याविषयी भिमाले यांनी केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार भिमाले यांच्याकडून होत असलेल्या अशाप्रकारच्या वक्तव्याबद्दल त्यांना समज द्यावी, असे पत्र मोरे यांनी महापौरांना दिले आहे. सभागृहनेता हा सर्व पक्षाच्या नगरसेवकांना सामावून घेणारा असला पाहिजे. परंतु भिमाले यांची भूमिका अशी कधीच नसते. त्यांच्या काळातच सर्वाधिक आंदोलने झाली आहेत, असे मोरे यांनी या पत्रात नमूद केले आहे. भिमाले यांनी याआधीही आपल्याला सभागृहात असे असंविधानिक शब्द वापरले आहेत. त्यावेळी त्यांच्याशी वाद झाला होता. भिमाले हे अचानक बेलगाम होतात. त्यांच्या बोलण्यातून त्यांची सत्तेची मस्ती दिसून येते. त्यामुळे त्यांना समज द्यावा, असे मोरे यांनी पत्रात म्हटले आहे. या प्रकारे सभागृहात होत राहिले तर शाब्दिक चकमक हाणामारीवर जाईल. त्याचे पडसाद एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात होतील, असेही या पत्रात नमूद केले आहे.

संभाजी ब्रिगेडचे निषेधाचे पत्र
भिमाले यांनी कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्याकडे असतील, तर त्यांनी ते तत्काळ जाहीर करावेत. भ्रष्टाचाराला कोणीही पाठीशी घालणार नाही. परंतु सभागृहात सुरू असलेली अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे पत्र संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी दिले आहे. भिमाले यांच्या या वक्तव्याबद्दल आयुक्त आणि महापौरांनी भिमाले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी धुमाळ यांनी केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)