पालिकेतील भ्रष्टाचाराला विरोध असल्यानेच विशेष सभेवर बहिष्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांचा खुलासा 

कराड – पालिकेतील रस्त्यांच्या कामे जास्तीत-जास्त एकाच कॉन्ट्रॅक्‍टरच्या नावाखाली 9.90 जादा दराने मंजूर करुन भ्रष्टाचार सुरु आहे. भारतीय जनता पार्टीचा याला पूर्णपणे विरोध आहे. याच कारणासाठी दोन विशेष सभेवर बहिष्कार घातला असल्याचा खुलासा भाजपाचे ज्येष्ठ नेते विनायक पावसकर यांनी पत्रकार परिषदेत केला. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालय व मंत्रालयातही जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे वगळता नगरसेवक फारुक पटवेकर, सुहास जगताप, इंद्रजित गुजर, नगरसेविका विद्या पावसकर, अंजली कुंभार व मिनाज पटवेकर उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले, रस्त्याची नऊ कामे एकाच कॉन्ट्रॅक्‍टरला दिली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधिताकडे चौकशी केली असता एकच काम मिळाल्याचे समजले. तर दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीत जी कामे मंजुरीसाठी येतात. त्यातील काही कामांना कमी प्रमाणात निधी दाखविला जातो. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत ती कामे जादा दर दाखवून पूर्ण झाल्याचे दाखवली जातात.

एका महिन्याच्या कालावधीत कमी व जादा प्रमाणात खर्च झाल्याचे दिसून येते. पालिकेत अशाप्रकारे भ्रष्टाचार सुरु असल्याचे निदर्शनास आल्यानेच या विरोधात आम्ही लढा पुकारला आहे. यामध्ये कोणाचाही समावेश असो त्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेस भाजपाच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची अनुपस्थिती असल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता पावसकर म्हणाले, भ्रष्टाचाराविरोधात आमचा लढा आहे. गटनेता म्हणून माझे काम मी केले आहे. या लढ्यात जे येतील ते आमच्या सोबत असतील आणि जे येणार नाहीत ते आमच्या सोबत नसतील. सत्ताधारी गटाकडून शहर विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केला जात आहे.

अनेक कामांचे टेंडर एकाच कॉन्ट्रॅक्‍टरच्या नावाखाली प्रसिद्ध करुन अक्षरश: लुटालूट सुरु आहे. काही कामे कमी दराने तर काही कामे जादा दराने केली जातात. दरातील तफावतीबाबत मुख्याधिकाऱ्यांनाही विचारणा केली आहे. परंतु त्यांनीही याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. तसेच नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या सहीनेच ही कामे मंजूर होत असतात. त्यामुळे त्यांचाही या भ्रष्टाचारामध्ये समावेश असू शकतो असा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. स्वच्छ सर्वेक्षण कराड शहराच्या दृष्टीने हितकारक आहे. त्याला आमचा कधीच विरोध नाही. गावाचे हित जोपासणे ही नैतिक जबाबदारी समजूनच भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारला आहे. प्रशासकाचे पालिकेत सर्व घडामोडींवर नियंत्रण नसल्याचा आरोपही त्यांनी केला. बांधकाम विभागामध्ये शहरातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचे एकाच कॉन्ट्रॅक्‍टरला नऊ तर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्‍टरला चार कामे देण्यात आली आल्याचे विनायक पावसकर यांनी सांगीतले.

एकाच कॉन्ट्रॅक्‍टरला नऊ कामे

बांधकाम विभागामध्ये शहरातील रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचे एकाच कॉन्ट्रॅक्‍टरला नऊ तर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्‍टरला चार कामे देण्यात आली आल्याचे विनायक पावसकर यांनी सांगीतले.

त्यांना आदेश वेगळीकडून येतात

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना शहरातील नागरिकांनी निवडून दिले आहे. नागरिकांच्या हिताचे काम करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. परंतु त्यांना आदेश वेगळीकडूनच येतात. ते नक्‍की कोठून येतात याची खातरजमा तुम्हीच करा, पालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराला भाजपाच्या सर्व नगरसेवकांचा विरोध आहे. भाजपाकडून मिळालेल्या निधीची कशाप्रकारचे लूटालूट सुरु आहे. याची सर्व माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना देण्यात आली असून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याची माहिती देणार आहे. तसेच ना. अतुल भोसले यांच्याही कानापर्यंत ही गोष्ट गेली असेल, असेही पावसकर यांनी यावेळी सांगीतले.

समित्यांच्या बैठकाच नाहीत

पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी प्रतिवर्षी 1 जानेवारी रोजी होतात. समितीच्या सभापती व उपसभापतींना त्यांची अधिकार व कर्तव्येच माहित नसल्याने वर्षभरात समित्यांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने काहीच बैठका होत नाहीत. महिला व बालकल्याण समितीच्या चार बैठका वगळता इतर कोणत्याही समित्यांच्या बैठका वर्षभरात झाल्या नाहीत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)