पालिकेतर्फे कॅन्सर वेदनेपासून आरोग्याकडे कार्यक्रम

पुणे,दि.26 – जागतिक डॉक्‍टर्स दिवसाच्या निमित्ताने पुणे महापिालकेचे आरोग्य खाते व पेनेक्‍स पेन मॅनेजमेंट क्‍लिनिक यांच्या संयुक्‍त विद्यमाने कॅन्सरच्या रुग्णांकरिता आणि त्यांच्या नातेवाईकांकरिता रविवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत कॅन्सर वेदनेपासून आरोग्याकडे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. कॅन्सरच्या वेदनांपासून मुक्‍तता मिळविण्यासाठी घरगुती व्यवस्थापन, योग, ध्यान, आहार, अधुनिक उपचार पध्दती इत्यादी विषयांवर विविध वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या कार्यक्रमाकरिता विनामुल्य प्रवेश आहे असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)