पालिकेच्या सर्व सुविधा आता एकाच छताखाली

प्रत्येक शाळेला इंटरनेट
महापालिकेच्या 300 शाळांमध्ये ई लर्निंग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व शाळांमध्ये संगणकीकरण करून व्हर्च्युअल क्‍लासरुम तयार करण्यात येणार असून, शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयात व्हर्च्युअल क्‍लासरूमचे मुख्यकेंद्र असेल. यासाठी प्रत्येक शाळेला इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तीन वर्षात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, येत्या 15 जूनला याची सुरूवात होणार आहे. ई लर्निंगसाठी बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रमच वापरण्यात येणार आहे. बालभारतीने तयार केलेला अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर एक सारखेच असेल याची दक्षता घेण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसे बालभारतीनेही कळविले आहे, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.

इ-लर्निंग प्रकल्पाचेही उद्या उद्‌घाटन : महापौर, आयुक्तांची माहिती

पुणे – पुणे महापालिकेच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि नागरिकांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेले पीएमसी केअर प्लॅटफॉर्म, कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जीआयएस सिस्टिम आणि शिक्षण मंडळाच्या ई लर्निंग प्रकल्पाचे उद्‌घाटन येत्या शुक्रवारी होणार आहे.

या अत्याधुनिक सेवेमुळे नागरी सुविधा अधिक जलदगतीने पुरविण्यासाठी मदत होणार असून, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठीही या सुविधांचा लाभ होईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते.

पीएमसी केअर 2.0
सध्या महापालिकेने नागरी तक्रार निवारणासाठी 10 विविध सुविधा निर्माण केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सुरू केलेल्या पीएमसी केअर सिस्टिमचे अधुनिक व्हर्जन नवीन ऍप्लिकेशनमध्ये वापरण्यात येणार आहे. यापूर्वीच्या ऍप्लिकेशनवर तीन वर्षांत नागरिकांच्या 80 हजार तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 97 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून महापालिकेच्या वेबसाईटवरील पीएमसी केअर 2.0 ऍप्लिकेशनच्या माध्यमातून जन्म आणि मृत्यू दाखला, झोन दाखला यासारखे आवश्‍यक दाखले एकाच ठिकाणी मिळणार आहेत. यामुळे दाखल्यांसाठी महापालिकेच्या कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत. मिळकतकर, पाणीपट्टी यासारखे कर या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या भरता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांचे श्रम आणि पैसेही वाचणार आहेत.

जीआयएस सिस्टीम
महापालिकेने मागील दीड वर्षात शहरात उपलब्ध असलेल्या महापालिकेच्या विविध स्वरूपाच्या 79 सेवांची माहिती गुगल मॅपवर लोकेट केली आहे. यामध्ये रुग्णालये, पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन आदी अत्यावश्‍यक सेवांसोबतच जमिनीखालील पाइपलाइन, ड्रेनेज लाईन्स, केबल्स आदींची माहिती उपलब्ध होणार आहे. एवढेच नव्हे, तर रस्त्याचे काम करताना जमिनीखाली कोणत्या “युटीलिटी सर्व्हिसेस’ आहेत याची माहितीही याद्वारे मिळणार असल्याने कामाचे आणि खर्चाचे योग्य नियोजन करणे शक्‍य होणार आहे. यासाठी अभियंत्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या वेबसाईटवर महापालिकेचे फेसबुक ऍप्लिकेशन असेल. त्यावर महापालिकेच्या विविध योजनांची तसेच धोरणात्मक निर्णयांची माहिती असेल. यावर नागरिकांना त्यांची मते मांडणे शक्‍य होणार आहे. यातून संबधित प्रकल्प अथवा धोरणांवर नागरिकांचा कल काय आहे, हे पाहून नियोजनाची योग्य दिशा ठरविण्यास मदत होणार असल्याचा दावा कुणाल कुमार यांनी केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)