पालिकेच्या विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे – माध्यमिक शिक्षा अभियांतर्गत पालिकेच्या दहा शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन कोर्स पूर्ण केले अशा विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. लेंड अ हॅंड व महापालिका यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा विद्यार्थ्यांचा गुणगौरव संमारंभ करण्यात आला.
करिअर मेळाव्यात उद्योजकही सहभागी झाले होते. उद्योजकांच्या माध्यमातून कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या जवळपास 70 विद्यार्थ्यांनी यावेळी नोकरीकरिता मुलाखती दिल्या. यातील36 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली असून 32 अधिक विद्यार्थ्याची इंटर्नशिप करण्यासाठी निवड करण्यात आली. या करिअर मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उद्योग जगतात आवश्‍यक असणाऱ्या क्षमता आणि कौशल्यांची माहिती मिळाली. तसेच प्रत्यक्ष मुलाखतीमधील आवश्‍यक संवाद कौशल्ये आणि व्यावहारीक कौशल्य प्रत्यक्ष अनुभवता आली. या नोकरी मेळाव्या बरोबरच इयत्ता 10 पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या संधी, तांत्रिक शिक्षणातील उपलब्ध करीअर यांविषयी माहिती देण्यात आली. कौशल्य अभ्यासक्रम आणि त्याचे महत्त्व याबद्दल उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी गौरव सोहळ्यात इंटर्नशिप उपलब्ध करून देणाऱ्या उद्योजकांनी व विद्यार्थ्यांनी आपले इंटर्नशिप करत असतानाचे अनुभव मांडले. यावेळी पालिकेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)