पालिकेच्या दंडेलशाहीन हॉटेल व्यावसायिकांमध्ये संताप

महाबळेश्‍वरमध्ये विरोध डावलून दर्जानुसार मिळतकर आकारणीच्या नोटीसा

महाबळेश्‍वर – हॉटेलमध्ये मिळणारी सेवा सुविधेच्या आधारे त्यांचा दर्जा ठरवुन प्रत्येक दर्जासाठी वेगवेगळे मिळकत कर आकारणीस हॉटेल व्यवसायिकांनी विरोध केला आहे. तरीही हॉटेल व्यवसायिकांचा विरोध डावलुन पालिकेने मिळकतकर वसुलीच्या नोटीसा बजावल्याने पालिकेच्या या दादागिरी विरोधात तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. जर पालिकेने हॉटेल व्यवसायिकांच्या हरकतींची दखल घेतली नाही तर पालिकेच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी येथील हॉटेल व्यवायिकांनी केली आहे.

न्यायालयाच्या निर्णयावर शिक्‍का मोर्तब करण्यासाठी येथील राम मंदिरात दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता सर्व मिळकतधारकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना करात पालिकेने घरगुतीसाठी 25 टक्‍के तर वाणिज्य वापराच्या मिळकतीवर 40 टक्‍के कर वाढ केली, इतकेच नाही तर येथील हॉटेलचे अ, ब, क असे तीन दर्जात विभागणी करून प्रत्येक दर्जासाठी वेगळा दर निश्‍चित केला तसेच हा दर बांधकाम क्षेत्रावर नाही तर मिळकतीमध्ये किती खोल्या आहेत. त्या खोल्यांवर कर आकारणी करून बिले वितरीत केली.

-Ads-

पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेचे जे कोणी कारभारी आहेत. त्यांनी हॉटेलचा दर्जा ठरविण्याचा जो जावईशोध लावला. त्यामुळे पालिकेचे उत्पन्न तर तिप्पट वाढले. मात्र या अन्यायकारक कर वाढीने हॉटेल व्यवसायिकांचे कंबरडे मोडले आहे. कारण या दर्जा नुसार कर आकारणीमुळे कोणाला दुप्पट तर कोणाला पाचपाट कर भरण्याची नोटीसा आल्या आहेत. लाखो रूपये कराच्या नोटीसा पाहुन येथील मिळकतधारकांचे डोळे पांढरे झाले आहेत. तर इरत मिळकत कर वाढीनेही शहरात पालिकेच्या कारभारी यांचे विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आमदारांचे प्रयत्नांनाही अपयश आ मकरंद पाटील यांनी कर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु त्यांनाही म्हणावे असे यश आले नाही. या बाबत हरकती मागविण्यात आल्या. या हरकतींची सुनावणी घेण्यात आली. परंतु पहिल्या हरकतींची दखल न घेता सर्वांच्या हरकती फेटाळण्यात आल्या. पुन्हा दुसरे अपिल घेण्याची सुचना पालिकेने केली. शहरात जवळपास आडीच हजार मिळकत धारक आहेत. त्यापैकी साधारण 900 मिळकत धारकांनी पहिल्यांदा हरकत घेतली होती.

पहिल्या हरकती फेटाळण्यात आल्याने पुन्हा त्यापैकी साधारण 400 मिळकत धारकांनी दुसरे अपिल दाखल केले. या 400 मिळकत धारकांमध्ये सर्वात जास्त हॉटेल व लॉज व्यवसायिकांचा भरणा अधिक आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खालील अपिलिय समितीने हरकतींची सुनावणी घेतली. या समितीनेही जुजबी कर कमी करून पुन्हा मिळकत धारकांना वसुलीच्या नोटीसा पाठविल्याने शहरातील मिळकत धारकातून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)