पालिकेच्या तीनशे शाळांमध्ये स्वाईन फ्लूबाबत जनजागृती

खासगी डॉक्‍टरांनाही देणार सूचना: आरोग्य विभागाकडून कार्यक्रम
पुणे – स्वाईन फ्लूबाबत आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी मंगळवारी आढावा घेतल्यानंतर आता पालिकेकडून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यांतर्गत शहरातील जवळपास पावणेतीनशे शाळांमध्ये स्वाईन फ्लू बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच पाच झोनमधील खासगी डॉक्‍टरांनादेखील सूचना देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे यांनी दिली.
सध्या शहरात वेगाने स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्याच्या तिप्पट वाढ ही ऑगस्ट महिन्यात झाल्याचे समोर आले आहे. बुधवारी झालेल्या पहाणीत शहरात आणखी 4 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या आता 50 वर पोहचली आहे. यातील 23 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लूची लक्षणे आढळलेल्या 5 हजार 635 रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात आल्या आहेत. तर अजुनही लाखो रुग्णांची तपासणी होत आहे.
दरम्यान सध्या हवेतील दमटपणा असल्यामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.
याबाबत आता पालिकेकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेण्यात येणार असून प्रत्येक घरापर्यंत पोहचण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती करण्याचा पर्याय पुढे आला आहे. येता काळ हा सणोत्सवांचा काळ असल्याने या वेगाने पसरणाऱ्या विषाणूपासून सावधानता बाळगण्याची अधिक गरज असल्याचेही डॉ.साबणे यांनी सांगितले.

पाच झोनमधील सर्व खासगी डॉक्‍टरांना स्वाईन फ्लूबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. तसेच पाच झोनमधील जवळपास पावणेतीनशे पालिकेच्या शाळांमध्ये स्वाईन फ्लू विषयी माहिती देण्यात येईल. याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून लवकरच आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात येतील.
डॉ.अंजली साबणे, सहायक आरोग्य अधिकारी
पालिका आरोग्य विभाग


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)