पालिकेच्या जुन्या वाहनांचा लिलाव

पिंपरी – मुदत संपून गेलेल्या महापालिकेच्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वापरात असलेल्या मात्र मुदत संपलेल्या या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत एकाच लिलावदाराने निविदा सादर केल्याने त्याच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.

महापालिका मालकीच्या एकूण 69 निकामी, जुन्या झालेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी लिलावदारांची कमिशनवर नेमणूक करण्यात येणार आहे. या नेमणुकीसाठी तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने दर मागविण्यात आले होते. मात्र, तीन वेळा निविदा मागवूनही एकाच लिलावदाराची निविदा प्राप्त झाली. त्यामुळे महापालिका आयुक्‍तांनी एकच निविदा उघडण्यास मान्यता दिली. त्यामध्ये रिलायन्स ऑक्‍शनर्स यांची निविदा प्राप्त झाली आहे. ही रक्कम आरटीओने विहित केलेल्या वाहनांच्या लिलावाच्या गोपनीय किंमतीच्या दोन टक्के अधिक रकमेची निविदा प्राप्त झाली आहे. हा दर स्वीकार करुन वर्षभराकरिता करार करणे व लिलावाद्वारे मिळणारे कमिशन देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)