पालिकेच्या कारभाराविरोधात कर्मचारी संघाचे सोमवारी उपोषण

 

सातारा, दि.30 (प्रतिनिधी) – सातारा नगरपालिकेतील वारसा हक्क कामगार भरतीतील अनियमिततेविरोधात आखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ दि. 2 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पालिकेतील आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसांना हक्काने नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, सातारा नगरपालिकेने 2002 पासून अनागोंदी कारभार केल्यामुळे कामगारांची संख्या वाढत गेली आहे. त्यामुळे आज कामगारांमध्ये असंतोष आहे. कामगार भरतीचा सभागृहामध्ये वेळोवेळी ठराव मंजूर होतात व त्यानंतर ठराव बेकायदेशीर ठरवून नामंजूर केला जातो. याबाबत चौकशी होवून न्याय मिळावा तसेच कामगार भरतीबाबत सभागृह समिती नेमण्याचा ठराव करते. त्याचाही विचार अधिकारी करत नाहीत. दरम्यान, कामगारांच्या भरतीसाठी उपोषण करण्यात आले. त्यावेळी समितीच्या शिफारशीनुसारच भरती प्रक्रिया पुर्ण केली जाईल असे लेखी आश्‍वासन देण्यात आले. मात्र, सभागृहात वेगळाच ठराव करण्यात आला. या ठरावाची चौकशी होवून कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी उपोषणाचा मार्ग स्विकारला असल्याचे पत्रकाव्दारे सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)