पालिकेचे “ऑनलाईन’ काम बंद राहणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे “सर्व्हर’ नव्याने “डेटा सेंटर’मध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे “ऑनलाईन’ कामकाज बंद राहणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बहुतांश कामकाज “ऑनलाईन’ पद्धतीने चालते. त्यामध्ये मिळकत कर भरणा, पाणीपट्टी, विवाह नोंदणी, परवाना, जन्म-नोंदणी संगणक प्रणाली, निविदा प्रक्रिया “ऑनलाईन’ पद्धतीने राबविली जाते.

-Ads-

महापालिकेचे “सर्व्हर’ नव्याने “डेटा सेंटर’मध्ये कार्यान्वित करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव 28 एप्रिल ते 1 मे दरम्यान सुट्टीच्या कालावधीत पालिकेचे “ऑनलाईन’ कामकाज चार दिवस बंद राहणार आहे. पालिकेच्या सर्व संगणक प्रणालींशी निगडीत “ऑनलाईन’ कामकाज व त्या अनुषंगिक सर्व “ऑनलाईन’ सेवा बंद राहणार आहेत, असे महापालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)