पालिकेची लेखी परवानगी दर्शनीय भागात न लावलेले मंडप बेकायदेशीरच

या मंडपांवर कारवाई का केली नाही? – हायकोर्ट 

मुंबई – गणेत्सोवात पालिकेने दिलेली लेखी परवानगी मंडपाच्या दर्शनी भागात न लावलेले मंडप हे बेकायदेशीर आहेत असे स्पष्ट आदेश दिलेले असताना या बेकायदा मंडपाविरोधात कारवाई का केली नाही असा संतप्त सवाल उच्च न्यायालयाने राज्यातील सर्वच पालीका प्रशासनाना केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयाच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्या पालीका अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी नोटीस बजावली जाईल.असे संकेत न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एस.एम. सोनक यांच्या खंडपीठाने देताना मुंबई, ठाण्यासह भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या सर्व महानगरपालिकांना पुढील सुनावणीच्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांची नावे सादर करण्याचे निर्देश दिले.

विविध उत्सवांच्या निमित्तीताने होणारे ध्वनी प्रदुषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍चभूमीवर उच्च
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या
खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी भिवंडी पालीकेने परीसर संवेदनशील असल्याने कायदासुव्यवस्थेचा प्रश्न
उभा राहू नये म्हणून बेकायदेशीर मंडपांवर कारवाई केली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने न्यायालयाने संताप व्यक्त
केला. कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता तुम्ही करू नका, त्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत. कोर्टाचे आदेश तुम्ही तुमच्या
सोयीनुसार कसे काय वापरू शकतात अस सवाल करून भिवंडी महानगरपालिका आयुक्तांना कोर्टाच्या आदेशांचा
अवमान केल्याबद्दल नोटीस बजावण्याचे संकेत हायकोर्टाने दिले.

भिवंडीत 113 बेकायदेशीर मंडप उभारले गेल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टासमोर सादर केली. यात
अनेक ठिकाणी पोलिसांची एनओसी नसतानाही पालिकेकडून परवानगी दिल्याची धक्कादायक कबूलीही पालिकेने
दिली.

मुंबई पालीकेचे घुमजाव
मुंबई महानगरपालिकेने मागिल सुनावणीच्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करून 44 मंडप बेकायदेशीर उभारण्यात आल्याची
दिलेली माहिती चुकीची होती केवळ तीनच मंडप हे बेकायदा असल्याचे सांगत आज न्यायालयात घुमजाव करत
प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)