पालिकेची नवीन इमारत पुन्हा चर्चेत : एसी आणि लिफ्टच्या निविदा गहाळ

5 कोटीच्या निविदेची फाईल गायब

– सुनील राऊत

-Ads-

पुणे – तब्बल 49 कोटी रुपये खर्चून महापालिकेने उभारलेली नवीन विस्तारीत इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या इमारतीसाठी बसविण्यात आलेल्या लिफ्ट आणि मध्यवर्ती वतानुकुलीत यंत्रणेच्या मूळ निविदा चक्क गहाळ झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या विद्युत विभागाकडून सर्व विभागांना पत्र पाठविण्यात आले असून ही मुळ निविदा प्रकरण असल्यास तातडीने देण्याची विनंती करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिकेची सर्व प्रकारणे ऑनलाईन असताना मुळ निविदाच गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेने बांधलेल्या या इमारतीचे उदघाटन 21 जून रोजी देशाचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याच दिवशी हा कार्यक्रम असताना ही इमारत गळाली त्यानंतर स्लॅबचा तुकडा पडणे, सभागृहात मोकाट कुत्री असणे, सभा सुरु असतानाच ठोकळा पडणे, पार्किंगच्या भिंती जिवंत झऱ्याने खराब होणे या प्रकाराने ही इमारत चांगलीच चर्चेत आली आता त्याच्या कामाच्या फाईलाच गहाळ झाल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

विस्तारीत इमारती मध्ये 4 लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण इमारतीसाठी सेंट्रल एसी बसविण्यात आला आहे. गहाळ झालेल्या या निविदाच्या कामाची किंमत 5 कोटीहून अधिक असून काम पूर्ण झाल्याने संबंधित ठेकेदाराने बिलं महापालिकेस सादर केली आहेत. मात्र, ही बिल देण्यासाठी मूळ निविदा संच आवश्यक आहे. मात्र, तोच गहाळ झाल्याने पालिकेच्या विद्युत विभागाची धावपळ सुरू आहे.

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
6 :cry:
15 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)