पालिकेची खरेदी-विक्री होणार पारदर्शक

साहित्य खरेदीचा हिशेब ठेवण्यासाठी स्वतंत्र “अॅप’

पुणे – महापालिकेकडून शहरासाठी केल्या जाणाऱ्या साहित्य खरेदीची प्रक्रिया आता आणखीन पारदर्शक होणार आहे. महापालिकेकडून कोणतेही साहित्य खरेदी केल्यानंतर कोणत्या विभागाने किती साहित्य खरेदी केले, किती पालिकेस मिळाले, त्यातील किती साहित्याचा वापर झाला, किती शिल्लक आहे याची माहिती आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. त्यासाठी “मटेरिअल मॅनेजमेंट’ अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे कोणत्या विभागाला कशाची गरज आहे, किती वस्तू खरेदी केल्या, प्रत्यक्ष किती आल्या याची कार्यालयात बसून माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्यवर्ती भांडार विभागाचे प्रमुख तुषार दौंडकर यांनी दिली.

-Ads-

महापालिकेकडून दरवर्षी लहान मोठ्या अशा सुमारे शंभर ते सव्वाशे कोटींच्या साहित्याची खरेदी केली जाते. आतापर्यंत कोणत्याही वस्तूची खरेदी करताना निविदा प्रक्रिया राबवून अथवा शासनाने निश्‍चित केलेला दर सुचीनुसार वस्तूची खरेदी केली जात होती. परंतु यामध्ये प्रशासनाकडून अनेक पळवाटा काढून चढ्या दराने वस्तू खरेदी करण्यात येत होत्या. वस्तू खरेदीतील गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्र शासनाने सर्व शासकीय कार्यालयांसाठी ऑनलाइन खरेदी (जीईएम) पोर्टलचा पर्याय समोर आणला. या जीईएम पोर्टलवर सध्या वाहनापासून ते थेट पेन, पेन्सिलपर्यंत सर्व वस्तू उपलब्ध आहेत.

ऑनलाइन खरेदी महापालिकेचे पैसे काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. परंतु नक्‍की कोणत्या विभागाला किती वस्तूची गरज आहे, किती खरेदी केल्या व प्रत्यक्ष किती वस्तू त्या विभागाला मिळाल्या याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतही यंत्रणा नाही. यामुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वतंत्र अॅप विकसित करण्यात आले आहे.

महापालिकेच्या वतीने वहान खरेदीपासून, संगणक, कार्यालयीन उपयोगाचे साहित्य खरेदी केले जाते. केवळ साहित्य खरेदीवर वर्षाला शंभर ते सव्वा कोटी रुपये खर्च होतात. याची सर्व माहिती एकत्रीतपणे या ऍपमुळे मिळणार आहे. यामुळे महापालिकेतील वस्तू खरेदीमध्ये आणखी पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
– तुषार दौंडकर, उपायुक्त

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)