पालिकेचा स्वच्छतेवर भर

पिंपरी- विसर्जन मिरवणुकी दरम्यान रस्ते अस्वच्छ राहू नयेत, याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात आल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुलाल उधळण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु यावर्षी शहरातील बऱ्याच मंडळांनी भंडाऱ्याची मुक्‍त उधळण केल्याची दिसून आली. शहरातील कित्येक रस्ते भंडाऱ्यामुळे पिवळे  झाले होते. तसेच इतर रंगाची देखील काही मंडळांनी उधळण केली. या रंगांमुळे अपाय होऊ नये, अथवा पाऊस पडल्यास  चिखल होऊन वाहनांचा अपघात होऊ नये, याची पालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत होती. सकाळपासूनच स्वच्छताकर्मी शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर तैनात झाले होते. वारं-वार मिरवणूक मार्गांची स्वच्छता करण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)