पालिकेचा मजूर कोट्यवधींचा मालक

मध्य प्रदेशातील छाप्याने यंत्रणा चक्रावली
इंदूर – मध्य प्रदेशमध्ये ड वर्गातील कर्मचारी असलेल्या असलम खान याच्या घरावर उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या संशयावरून लोकायुक्त पोलिसांनी छापा घालून सोने व चांदीसह 22 लाख रुपये रोख व सोने जप्त केले. पोलिसांना त्याच्याकडे 4 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा संशय आहे.

लोकायुक्त पोलिसांच्या चौकशी पथकाने मध्यप्रदेशात नागरी शाखेच्या ड वर्गातील कर्मचारी, असलम खान याच्या घरावर त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींच्या आधारावर खानशी संबंधित पाच मालमत्तांवर छापे टाकले. त्यांनी टाकलेल्या या छाप्यामध्ये त्यांना 4 कोटी रुपयांच्या खरेदी विक्री आणि इतर अवैध्य मालमत्ते संबंधातील कागदपत्रे मिळाली असून सदर प्रकरणी लोकायुक्त उपअधीक्षक प्रवीण सिंग बगेल यांनी तक्रार केली आहे.

-Ads-

खान इंदौर महानगर पालिकेतील मजूर या ड वर्गातील कर्मचारी आहे. सध्या तो अतिक्रमण विरोधी पथकात कामाला आहे.

1998 साली खान 500 रुपये दरमहा वेतनावर रुजु झाला होता. मात्र सध्या त्याचा पगार दरमहा 18 हजार इतका आहे. अशी माहिती लोकायुक्त एसपी दिलीप सोनी यांनी दिली आहे.

यावेळी पुढे बोलताना सोनी म्हणाले की, आम्ही त्याच्याकडून लक्‍झरी चारचाकी तसेच 22 लाख रुपये रोख, सोने व चांदीचे दागिने जप्त केले आहेत. याशिवाय, आम्हाला इंदूर, रतलाम आणि देवस येथील प्लॉट्‌स आणि घरांसह 20 अचल संपत्तीबद्दल माहिती मिळाली आहे.

त्याच्या कडील सोन्यामध्ये 100 ग्रॅम सोन्याचे बिस्किटे आणि 10 कुटुंबातील सदस्यांची नावे असलेली 10 बॅंक खाती सापडली आहेत. तसेच या बॅंक खात्यांमध्ये देखिल मोठी रक्कम जमा असून ती रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे. सध्या जरी त्याच्या कडे 4 कोटींची बेहीशेबी मालमत्ता सापडली असली तरी बेहिशेबी मालमत्तेचे मूल्य विस्तृत तपासणी नंतर वाढू शकते, असे ते पुढे म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)