पालिकेचा उजेड तर महावितरणचे लोड शेडिंग

सातारा ः सदरबझार परिसरातील खांबावर सुरू असलेले दिवे.

अजब कारभाराने सातारकर त्रस्त

सातारा, दि.9 ( प्रतिनिधी)- शहरात प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. एका बाजूला महावितरणने अघोषित लोड शेडिंग सुरू केले आहे तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या खांबांवर रात्री ऐवजी दिवसा दिवे सुरु ठेवले जात असल्याचा प्रकार सध्या घडत आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात दुपारच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात झाली. त्याचे प्रमाण आता वाढत चालले असून तीन ते चार तास सलग पुरवठा खंडित केला जात आहे. त्याचा परिणाम शहरातील व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात तर होतच आहे त्याचबरोबर ऑक्‍टोबर हिटमुळे हैराण झालेल्या सातारकरांना उकाड्यात दिवस काढावा लागत आहे. त्यामुळे आता नागरिक व नेत्यांनी महावितरणच्या अघोषित लोड शेडिंग विरोधात आवाज उठवण्याची मागणी होत आहे. तर दुसऱ्याबाजूला पालिकेच्या रस्त्यांवर लावलेले दिवे हे रात्रीचे बंद आणि सकाळी चार तास चालू असल्याचे प्रकार आता रोज घडू लागलेत. मंगळवारी सकाळी शहरातील दिवे हे कित्येक तास सुरू होते. मात्र, त्याबाबतची माहिती पालिकेला मिळून देखील तात्काळ बंद करण्यात आले नाहीत. त्यामुळे पालिकेला कर भरणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)