पालिकेचा ई-लर्निंग प्रकल्प रुळावर

पहिल्या टप्प्यातील 100 शाळांचे काम पूर्ण

पुणे – पालिकेच्या 101 शाळांमध्ये ई-लर्निंग ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. 31 शाळांमध्ये क्‍लासरूम सुरू करण्यात आले आहेत. हे काम देण्यात आलेल्या बीएसएनएल कंपनीस हे काम करण्यासाठी जून-2018 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण होण्यास नोव्हेंबर-2018 उजाडला आहे. त्यामुळे 21 कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा प्रकल्प अखेर रुळावर आला आहे.

-Ads-

महापालिकेच्या 287 शाळांमधील 1 लाख मुलांसाठी हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठीचे काम बीएसएनएलला देण्यात आले आहे. या कामाची सुरुवात मार्च-2018 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत म्हणजे जूनपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, हे कामच पुढे न सरकल्याने महापालिकेने चार टप्प्यांत करण्याचा निर्णय घेत, पहिल्या टप्प्यात 50 शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 5 सप्टेंबर 2018 पर्यंत पहिला टप्प्यात हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत सुरू करण्याच्या सूचना संबंधीत कंपनीस देण्यात आल्या. त्यानुसार, हा प्रकल्प सुरू झाला होता. तर चालू शैक्षणिक वर्षात पालिकेच्या 100 शाळांमध्ये ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे उदीष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार, नोव्हेंबर महिन्यातच हे काम पूर्ण झाले असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पुढील आठवड्यात यंत्रणेची तपासणी
कंपनीस देण्यात आलेले काम झाले असल्याने त्यांना लवकरच, पत्र देऊन उर्वारीत शाळांचे कामही याच शैक्षणिक वर्षात सुरू करण्याचे पत्र दिले जाणार असल्याची माहिती दौंडकर यांनी दिली. त्यानुसार, पुढील टप्प्यात आणखी 50 शाळा घेतल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कंपनीकडून बसविण्यात आलेल्या या यंत्रणेची तपासणी पुढील आठवड्यात केली जाणार असून या उपक्रमांतर्गत शिक्षण मंडळात उभारण्यात आलेल्या मुख्य स्टुडीओमधून या शाळांमधील मुलांशी पुढील आठवड्यात संवाद साधला जाणार असल्याचे दौंडकर यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)