पालिकेकडून कृषि प्रदर्शनात स्वच्छता मोहिम

कराड – येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेली चार दिवस सुरु असलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषि व औद्योगिक प्रदर्शनात कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 12 पोती कचरा गोळा करण्यात आला.

यंदाचे हे पंधरावे कृषि प्रदर्शन असून प्रदर्शनस्थळी जिल्ह्यासह बाहेरुनही अनेक नागरिक येत असतात. प्रदर्शनाची उंची उत्तरोत्तर वाढत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांसाठी सर्व शेतीच्या उपकरणांसह खाद्यपदार्थही उपलब्ध करण्यात आले आहेत. प्रदर्शन पहायला येणाऱ्यांकडून खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर कचरा इतरत्र फेकला जातो. यामध्ये दूधाच्या प्लॅस्टीक पिशव्या, स्टॉलधारकांची माहिती असणारे माहितीपत्रके कागदी डिश यांचा जास्तीत-जास्त समावेश असतो. या कचऱ्यामुळे कृषी प्रदर्शनाच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याने स्वच्छतेचा वसा घेतलेल्या कराड नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने येथेही स्वच्छता मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सोमवारी रात्री पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोग्य सभापती प्रियांका यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 12 पोती कचरा गोळा करण्यात आला. पालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छ क्रांती मोहिमेत सामाजिक कार्य करणाऱ्या एनव्हायरो नेचर क्‍लबने पुढाकार घेतला होता. यावेळी प्रियांका यादव, नगरसेवक विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक घन:शाम पेंढारकर, प्रितम यादव, जालिंदर काशिद, शिवाजी पवार, मुकादम व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. पालिकेच्या या उपक्रमाची दखल घेत कृषि प्रदर्शनाच्या आयोजकांनी पुढील दोन दिवसात कचरा साठून राहू नये याची काळजी घेणार असल्याची ग्वाही दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)