पालिका शाळा शिक्षकांच्या बदल्या कधी?

‘माननीयांचा’ हस्तक्षेप 


शिक्षकेतर कर्मचारीही प्रतीक्षेत

पुणे- महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षीही न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी असलेले शिक्षक आणि कर्मचारी पुढेही त्याचठिकाणी कायम राहणार आहेत.

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत अजून निर्णय झाला नाही. मात्र, ज्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यांच्या बदल्या कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये केल्या जातील.
– शिवाजी दौंडकर, शिक्षण प्रमुख, पुणे मनपा.

महापालिकांपासून स्वायत्त असलेली शिक्षण मंडळे शिक्षक हक्क कायद्यामुळे बरखास्त झाली. त्यानुसार पुणे महापालिकेचे शिक्षण मंडळाचे अस्तित्त्व गेल्यावर्षी जून महिन्यात संपुष्टात आले. त्यामुळे शिक्षण मंडळाचा कारभार महापालिका प्रशासनामार्फत सुरू झाला आहे. परंतु अजूनही मंडळ अस्तित्त्वात असताना ज्या पद्धतीने संस्थांनिकांसारखा कारभार सुरू होता, तसाच कारभार सुरू असल्याचे दिसून आले आहे.

शिक्षणमंडळ अस्तित्त्वात असताना शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा कायमच वादग्रस्त विषय होता. स्वायत्तता नष्ट झाल्यानंतरही परिस्थिती बदलली नसून, तोच प्रकार आताही सुरू आहे. त्याची परिणती म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षातही शिक्षक, शिपाई, रखवालदार यांच्या बदल्या होणार नाहीत. प्रशासनाकडून तसे स्पष्टही करण्यात आले आहे.
मात्र हे स्पष्ट करताना प्रशासनाने जे कारण दिले आहे, ते धक्कादायकच आहे. शिक्षकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदली प्रकरणात “माननीयांचा’ हस्तक्षेप होतो. मर्जीतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची बदली रद्द करण्यासाठी अथवा त्यांना सोयीची शाळा मिळावी यासाठी खासदार, आमदार आणि नगरसेवक यांचा अधिकाऱ्यांवर दबाव येतो. त्यामुळेच बदलीच्या झंझटीत पडूच नये असा पवित्रा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

दरम्यान प्रशासनाने बदल्या करण्यासाठी जे कारण पुढे केले आहे, त्यातही वस्तुस्थिती आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालिन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या होत्या, मात्र, त्यावर चांगलाच गदारोळ झाला होता, शिक्षण संघटना आणि “माननीयांनी’ त्याला तीव्र विरोध केला होता, त्यामुळे प्रशासनाला बदल्यांचा निर्णय मागे घ्यावा लागला होता.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)