“डीबीटी’द्वारे शिष्यवृत्ती योजनेचा मुलांना होतोय फायदा
पुणे – महापालिकेकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या मुलांना देण्यात येणाऱ्या शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत गेल्या महिनाभरात साडेसात हजार मुलांच्या खात्यात थेट “डीबीटी’ अर्थात थेट लाभार्थीच्या बॅंक खात्यात योजनेद्वारे शिष्यवृत्ती जमा करण्यात आली आहे.
महानगरपालिका हद्दीतील इयत्ता 10 वी आणि 12 वीमध्ये खुल्या गटांतील मुलांना असलेल्या दहावीसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद योजना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय देण्यात येते. दहावीसाठी 15 हजार, तर 12 वीसाठी 25 हजार रुपये दिले जातात.
यावर्षी ऑनलाइन पद्धतीने दि.25 जुलै ते 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, तोपर्यंतही दहावी, बारावीचे प्रवेश झालेले नसल्याने ही मुदत 29 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. होती, त्यानंतर पुन्हा महिनाभराने अचानक या शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी वाढ करत दि.24 ते 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानंतर अखेर 12 हजार 840 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील सुमारे 7 हजार 869 मुलांच्या खात्यात ही शिष्यवृत्ती जमा केल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाने दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा