…पालिका, पीएमपीलाही उत्पन्न मिळणार

पुणे – स्मार्ट सिटी अंतर्गत पुणेकरांना लवकचर स्मार्ट सुविधाही दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून संपूर्ण शहरात ई-कॅरिडोर उभारले जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

या सुविधा देण्यासाठी स्मार्ट सिटीकडून एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागविण्यात आले असून या प्रकल्पांसाठी महापालिका आणि पीएमपीची जागा वापरली जाणार असल्याने त्यांचीही मान्यता घेतली जाणार आहे. यात बस थांबे, पथदिवे, स्मार्ट स्वच्छतागृहे तसेच नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी जाहिरांतीसाठी मान्यता दिली जाणार असून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 33 टक्के भाग महापालिकेस तसेच पीएमपीलाही दिला जाणार आहे.

तसेच या प्रकल्पा अंतर्गत ज्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी संबधित कंपनीकडेच असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)