पालिका पदाधिकाऱ्यांचा अमेरीकेत गणेशोत्सव 

अमेरीकेत क्‍लायमेट अँड क्‍लीन एअर पुरस्कारासाठी गेलेल्या महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अमेरीकेत गणेशोत्सव साजरा केला.

पुणे : अमेरीकेत क्‍लायमेट अँड क्‍लीन एअर पुरस्कारासाठी गेलेल्या महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी अमेरीकेत गणेशोत्सव साजरा केला.

या वेळी पुण्यातील अमेरीकेत राहणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आरती केली. कॅलिफोर्निया येथे स्थायीक असलेले सलील जोशी या गणेश भक्ताच्या निवासस्थानी गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , स्थायी समिती अध्यक्ष  योगेश मुळीक आणि सह महापालिका आयुक्त सुरेश जगताप यांच्यावतीने गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी समस्त पुणेकरांच्या वतीने अमेरिका येथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या, यावेळी महाराष्ट्र मंडळ बे एरियाचे अध्यक्ष विजय राऊत, सदस्य शार्दूल वेळापुरे, येथील ढोल पथकाचे प्रमुख अजिंक्‍य रानडे आणिचेतन बुराडे हे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)