पालिका देणार 152 कोटींची थकबाकी

स्थायी समितीत 65 कोटींचा वर्गीकरणाचा प्रस्ताव

पुणे : महापालिकेने खडकवासला धरणातून उचलेल्या वाढीव पाण्याच्या रकमेपोटी तसेच थकबाकी पोटी पाटबंधारे विभागाकडून महापालिकेकडे 152 कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी पत्राद्वारे केली होती. ही थकबाकी देण्यास महापालिका प्रशासनाने तयारी दर्शविली असून त्यानुसार, सुमारे 65 कोटींच्या वर्गीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाकडून समितीसमोर आणण्यात आला होता. मात्र, समितीने तो पुढील आठवड्यात ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

-Ads-

जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने निश्‍चित केलेल्या सुधारीत दरांनुसार, पाटबंधारे विभागाने महापालिकेकडे 2015 पासूनची पाणी वापराच्या जादा रकमेची थकबाकीपोटी सुमारे 352 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, ही रक्कम चुकीच्या पध्दतीने आकारल्याचे सांगत, तसेच त्यात पालिकेने केलेला पाणी वापरही चुकीचा असल्याचे सांगत पालिकेने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यावरून या दोन्ही विभागात गेल्या काही महिन्यांपासून शितयुध्द सुरू होते. त्यानंतर ही बाब जलसंपदामंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर दोन्ही विभागांनी संयुक्त बैठक घेऊन बिलांची तपासणी करून त्यावर तोडगा काढावा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने बिलांची तपासणी केल्यानंतर पालिकेने 92 कोटींची बीले देण्याची तयारी दर्शविली होती.

मात्र, त्यात वाढ करत पाटबंधारे विभागाने 152 कोटींची नव्याने मागणी केली आहे. तसेच मागील आठवड्यात झालेल्या कालवा समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीतही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही पालिकेने तातडीने 15 दिवसांच्या आत ही थकबाकी पाटबंधारे विभागास देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यास बैठकीत उपस्थित असलेले महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तयारी दर्शविली होती. त्यानुसार, प्रशासनान स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी आणण्यात आला. मात्र, समितीने तो दाखल करण्यास नकार दिला. या विषयावर चर्चा करायची असल्याने तो पुढील मंगळवारी होणाऱ्या समिती मध्ये सादर करावा; त्यास मान्यता देऊ, असे समितीकडून सांगण्यात आले.

यापूर्वी दिले 18 कोटी
या थकबाकी पोटी महापालिकेने या पूर्वीच जलसंपदा विभागास 18 कोटी रुपये दिले आहेत. पहिल्यांदा ज्यावेळी जलसंपदा विभागाने 354 कोटींची मागणी केली होती. त्यावेळी पालिकेने 48 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यास स्थायी समितीनेही मान्यता दिलेली असून पालिकेने या पूर्वीच 18 कोटी रुपये जलसंपदा विभागास दिलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)